शुक्रवार, 3 अगस्त 2018

जीवन साथी चुनते समय


महाविद्यालयीन जीवनामध्ये महाविद्यालायामध्ये मुलींसाठी ऐका आगळ्या वेगळ्या विषयावर भाषण आयोजित केले होते. तसेच ती भाषण देणारे व्यक्तिमत्व पण खूप मोठे होते. त्या भाषणाचा विषय होता ‘’वयात येताना आणि जोडीदार निवताना’’. मुलांसाठी ते भाषण नव्हते कारण त्यामध्ये मुलींच्या मासिक पाळीविषयी सांगणार होते. कुतूहलाने आम्ही मुली गेलो त्या वेळी विचारणा आवडी चालना नसल्याने त्यांनी सांगितलेल्या सर्व गोस्टी पटून आल्या. पण आता मला त्या भाषणातील काही गोस्टी नाही पटत आहेत.
त्यातली पहिली बाब हि कि आम्हा मुलीना तिथे हे ऐक्ण्यासाठी बोलावले मुलांना नाही बोलावले. याचे कारण काय होते? त्या वेळी वाटल कि आम्हाला लाज वाटेल. पण आज अक्षय कुमार padmanचित्रपट काढतो आणि pad चे महत्व समजावतो. आणि मुलांना या बद्दल माहिती असते. नववी , दहावीच्या विज्ञानच्या पुस्तकात सोप्या भाषेत मासिक पाळी बद्दल लिहाल आहे. मला तर वाटते कि मुलांना पण या बद्दल माहिती होयलाच  हवे, कारण त्यांच्या आयुष्यात पण बहिण, बायको, आई, प्रियसी आहेतच ना. तरच ते त्यांच्या घरच्या बायकांची काळजी घेतील.
तसेच त्यांनी ऐक विषय अधोरेखित केला कि आपण आयुष्यात जोडीदार निवडताना पण हा विचार करा कि तो आपल्या जातीचा आहे का ? आपल्या धर्माचा आहे का ? कारण अस होत त्याच्या मागच कि आपल्या जातीचे गुण आपल्या मुलामध्ये आले पाहिजेत. जर तुम्ही क्षत्रिय आहात आणि ब्राह्मण मुलाशी लग्न केलेत तर तुमचे DNA बदलतील आणि जन्माला येणारे मुल निट गुणाचे नसेल कारण ते पूर्ण क्षत्रिय नसेल आणि पूर्ण ब्राह्मण नसेल. माझे या बाबीला १००% विरोधी मत आहे.
माणूस हा प्राणी आहे. फरक ऐवडा आहे कि माणसाला निसर्गाने सर्व प्राण्या पेक्षा मोठा मेंदू दिला आणि त्या मुळे  तो बोलू शकतो. मग आपण बघतो कि गाई संकरीत करतात, तसेच बकरी तसेच फळे पण संकरीत करतात. याचे कारण आपण जाणतो कि जर बियाणे संकरीत असेल तर येणारे फळ तुलनेने चांगले असते. ऐका संशोधनाने हे सिद्ध केले आहे कि जेव्हा चीन चे घोडे जे उंचीने लहान होते ते आणि अमेरिकन घोडे यांचे DNA एकत्र केले तेव्हा संकरीत घोडे जन्माला आले तेव्हा त्यांची उंची वाढली होती.
मग तसेच जर माणूस या प्राण्यातील क्षत्रिय कुळातील मुलाने ब्राह्मण कुळातील मुलीशी लग्न केले तर त्या मुला मध्ये दोन्ही गुण येतील. जन्माला येणारे मुल साह्शी आणि बुद्धीमान असेल तसेच सर्वात मोठी बाब मला वाटत सर्वांनी समजली पाहिजे ती म्हणजे ते जन्माला येणारे मुल ना ब्राह्मण असेल ना क्षत्रिय इथेच धर्म आणि जाती -पतीचा नाश होईल. आणि जगात ऐक जात माणूस आणि माणुसकी धर्म जन्माला येईल.आणि असेच काही लोक समाजात आहेत कि हे सर्व संस्कार मुलांच्या मनावर महाविद्यालयीन जीवनात गोंदवतात. जे चुकीचे आहे . कोणाशी लग्न करणे हे प्रत्येकाच्या पसंतीवर आहे, पण मुलगा आणि मुलगी यांची जात , धर्म ,प्रदेश वेगळा आहे म्हणून लग्नाला परवानगी न देणे हे तितकेच चुकीचे आहे.
हे माझे स्वतःचे विचार आहेत . कोणी सहमत असेल याची गरज नाही. माझा हेतू कोणाचे मन , भावना दुखावण्याचे नाही. प्रतिक्रिया जरूर द्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें