मी कोंकणी आहे आणि त्यातून रत्नागिरी मध्ये आमचे गाव. आम्हाला जर उच्च शिक्षण घेयचे असेल तर मुंबई परवडते. कारण आमच्याकडचे बरेच पाहुणे मुंबई ला राहतात कारण आमच्या कडे रोजगार नाहि म्हणुन ते कामासाठी मुंबई ला राहतात. यातून आपणास समजले असेल कि आम्ही कोंकणात राहतो आणि आम्हाला रोजगार आणि उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठावी लागते. आम्ही जास्त काळ गावी नाही राहत. मे महिना, गणपती, दिवाळी आणि शिमगा यासाठी जेमतेम ७-८ दिवस येतो . मुंबई या वेळी २०% तरी खाली होते. आम्ही जास्त आमच्या कोंकण रेल्वेनी प्रवास करतो. मुंबई ते रत्नागिरी रेल्वेचा म्हणजे passenger चा ८ तासाचा प्रवास कारण अजून आमची दुहेरी रेल्वे पटरी रोह्यापुर्ती आहे, काम मागचे चार वर्ष चालू आहे आणि जर सुपर फास्टने आलो आणि क्रोस्सिंग मिळाले तर ६ तास आणि नाही मिळाले तर ४ तास.

घरी मे महिन्यात येताना ऐक छोटा मुलगा माझ्या जवळ बसला त्याला विचारल गावी निघालास का? तर बोलला हो ग आजोबांनी बोलावलं आहे त्यांनी ना माझ्या साठी हापूस आंबे आणि फणस ठेवलाय. म्हुणुन मी गावी जात आहे. तो मुलगा जेमतेम ५ वर्षाचा होता आणि तो आणि मी समान टेवतात तिथे महिलाच्या डब्यात होतो. आम्ही आंबे खायला, सन साजरे करायला गावी येतो कारण आमचे नाळ अजून गावशी जोडले आहे.काही दिवसापूर्वी ऐका मित्राशी बोलन झाल कारण त्यान ऐक status ठेवला होता. भावपूर्ण श्रद्धांजली. त्याने सांगितलं हा माझा मित्र होता मे महिन्याच्या सुट्टी मध्ये गावी येत होता मुंबई वरून. ट्रेन मधून पडून मेला.
आम्ही कामासाठी आणि शिक्ष्णासाठी मुंबई ला आलो. आणि स्थायिक पण झालो. पण आही आमच गाव का सोडलं? याच कारण कि आमच्या कडे सरकारने काहीच रोजगार निर्माण केला नाही. आणि शिक्षण आहे पण आमच्या कडे व्यावसायिक शिक्षण नाही आहे. म्हुणुन आही मुंबईला पोहचतो. आणि अश्या प्रवासात आम्ही आमचे मित्र आणि नातेवायिक गमावतो. कधी महाड चा पूल तुटतो आणि बस मधून खाली जातो तर कधी ट्रेन मधून पडतो. हि अवस्था फक्त कोकणाची नाही आहे पूर्ण देशाची आहे. मला सर्वाना विचारायचं आहे कि हि अवस्था असतना बुलेट ट्रेन महत्वाची कि गावात रोजगार निर्माण करन,चांगले व्यासायिक शिक्षण देणे आणि दळणवळणची साधने सुधारणे गरजेचे आहे.जर गावात रोजगार आला तर लोक स्थलांतरित नाही होणार आणि जर दळणवळण सुधारले तर आम्ही गावात सुरक्षित येऊ आजोबांकडे हापूस आंबे खायला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें